Saturday, 21 September 2019

ISRO ने चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरबद्दल दिली माहिती


चांद्रयान-2 मोहिमेत पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानल्यानंतर इस्रोने आज ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली.

ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे असे इस्रोने म्हटले आहे.

चांद्रयान-2 चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत.

ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. वि
चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला होता.

तसेच आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे.

पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment