Saturday, 28 September 2019

IMDच्या ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’मध्ये भारत 44 व्या क्रमांकावर

स्वित्झर्लंडच्या IMD संस्थेचा भाग असलेल्या ‘वर्ल्ड कॉम्पिटीटिव्हनेस सेंटर’ या विभागाकडून ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ या शीर्षकाखाली जागतिक स्पर्धात्मकतेच्या बाबतीत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्यवसाय, सरकारी आणि व्यापक समाजातल्या आर्थिक परिवर्तनासाठी एक मुख्य चालक ठरणार्‍या डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास आणि त्यांचे अन्वेषण करण्यासाठी 63 राष्ट्रांची क्षमता आणि तत्परता यांचे मूल्यमापन करते.

अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी, अभ्यासात तीन घटकांना विचारात घेतले जाते:
(i) ज्ञान - नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता; (ii) तंत्रज्ञान - नवीन डिजिटल क्षेत्राच्या नवकल्पना विकसित करण्याची क्षमता; आणि (iii) भविष्यातली तत्परता - आगामी विकासासाठीची तयारी.

या यादीत यंदा भारताने चार स्थानांची प्रगती दाखवीत 44 वे स्थान प्राप्त केले आहे. भारताने ज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब व शोध घेण्यासाठी भविष्यातल्या तयारीच्या बाबतीत विशेष सुधारणा केली आहे. दूरसंचार क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या बाबतीत भारताने प्रथम स्थान मिळविले.

अन्य ठळक बाबी

🔸संयुक्त राज्ये अमेरिका (USA) ही जगातली सर्वाधिक डिजिटल स्पर्धात्मक अर्थव्यवस्था आहे.

🔸अमेरिकेच्यापाठोपाठ पुढे सिंगापूर (2), स्वीडन, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, फिनलँड, हाँगकाँग SAR, नॉर्वे आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांचा प्रथम 10 मध्ये क्रम लागतो.

🔸अमेरिका आणि स्वीडन हे देश ज्ञाननिर्मिती, तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रोत्साहनपूर्ण वातावरणाची निर्मिती आणि अभिनव कल्पनांचा अवलंब करण्याची तयारी यांच्यात संतुलित दृष्टीकोन ठेवतात. सिंगापूर, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड एक किंवा दोन घटकांना प्राधान्य देतात.

🔸हॉंगकॉंग SAR, कोरिया प्रजासत्ताक, तैवान आणि चीन यासारख्या अनेक आशियाई अर्थव्यवस्थांनी 2018 सालाच्या तुलनेत यंदा लक्षणीय प्रगती दर्शविलेली आहे. या सर्व अर्थव्यवस्थांनी त्यांच्या तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये आणि त्यांच्या व्यवसायातील चपळाईमध्ये उल्लेखनीय प्रगती दर्शविलेली आहे.

🔸भारत आणि इंडोनेशिया या देशांनी अनुक्रमे चार आणि सहा स्थानांनी झेप घेतली असून, प्रतिभा, प्रशिक्षण आणि शिक्षण तसेच तांत्रिक पायाभूत सुविधांचा विस्तार अश्या बाबतीत सकारात्मक परिणाम अनुभवले.

🔸मध्य-पूर्व प्रदेशामध्ये, संयुक्त अरब अमिरात आणि इस्त्राएल हे प्रमुख प्रादेशिक डिजिटल केंद्र म्हणून कायम राहिले.

🔸लॅटिन अमेरिकेत मेक्सिको आणि कोलंबिया केवळ या देशांनीच या वर्षी प्रगती दर्शविलेली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...