🅾भारतीय व्यक्तीस अवकाशात पाठवण्याच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अवकाशवीरांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा भारतीय हवाई दलाने पूर्ण केला असून त्यात टेस्ट पायलट (वैमानिकां)ची निवड करण्यात आली आहे.
🅾या सर्व उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या, रेडिओलॉजी चाचण्या, प्रयोगशाळेतील चाचण्या, वैद्यकीय चाचण्या, मानसिक चाचण्यांची पूर्तता करण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. प्राथमिक टप्प्यात २५ जणांची निवड केली असून यातून आणखी चाळण्या लावून २-३ संभाव्य अवकाशवीरांची निवड केली जाणार आहे.
🅾यासंदर्भात इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मोहिमांत टेस्ट पायलटचीच निवड केली जाते असा जगातील समानव मोहिमांतील अनुभव आहे. यातून निवड केलेल्या व्यक्तींना नोव्हेंबरनंतर प्रशिक्षणासाठी रशियात पाठवले जाणार आहे.
No comments:
Post a Comment