Thursday, 12 September 2019

न्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर


✍  न्युझीलंडचे अर्थमंत्री ग्रांट रॅाबर्टसन यांनी ३० मे २०१९ रोजी गरीबी, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसा यासारख्या वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केला.

✍ न्युझीलंड सरकाने हा अर्थसंकल्प देशातील असमानता, गरीबी या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सादर केला आहे.

✍ या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकास दराला प्राधान्य न देता जनतेच्या कल्याणासाठी प्रधान्य देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे.

✍ आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते न्युझीलंडचा आर्थिक विकास दर २०१९ मध्ये २.५% वरून २०२० मध्ये २.९%पर्यंत वाढू शकेल असा अंदाज आहे

✍ न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मानसिक आरोग्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी १.९ अब्ज न्युझीलंड डॉलर एवढा निधी राखून ठेवण्यात आला.

✍ या अगोदर भूतान या देशाने जगात प्रथमच आनंद निर्देशांक (Happiness Index) ही संकल्पना मांडली होती.

✍ याआधारे देशातील किती लोक समाधानाने आयुष्य जगू शकता याचे मापन करण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात आला होता.

✍  यासाठी २००८ मध्ये नागरिकांच्या आनदांचे मापन करण्यासाठी भूतान ने ग्राॅस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

✍  त्यानंतर न्युझीलंडने प्रथमच आपल्या अर्थसंकल्पात मोठा वाटा जनतेच्या आंनद आणि कल्याणकारी साठी राखून ठेवण्यचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...