Thursday, 12 September 2019

‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ला सुरुवात झाली

√दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस अश्या रोगांना लक्ष्य करीत देशव्यापी ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ याचा आरंभ करण्यात आला.

√केंद्र सरकारने या योजनेसाठी येत्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2024 सालापर्यंत 12,652 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

■कार्यक्रमाविषयी

√प्राण्यांमध्ये आढळून येणार्‍या पाय व मुखरोग (FMD) या धोकादायक रोगाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरातल्या गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे अश्या 500 दशलक्षाहून अधिक जनावरांचे लसीकरण करणे हे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. शिवाय ब्रुसेलोसिस रोगाविरूद्धच्या लढाईत दरवर्षी 36 दशलक्ष गायीच्या मादा वासरांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

■कार्यक्रमाचे दोन घटक –

√2025 सालापर्यंत रोगांवर नियंत्रण आणणे

✅ 2030 सालापर्यंत पाय व मुखरोगांचे (FMD) निर्मूलन करणे

गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकर इत्यादी पशूंमध्ये पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस हे रोग सामान्यपणे आढळून येतात. जर दुधावर असलेले पशू रोगाची लागण झाली असेल तर शंभर टक्क्यांपर्यंत दुधाचे नुकसान होऊ शकते जे जवळपास चार ते सहा महिने टिकू शकते. त्यामुळे उत्पादकाला अत्याधिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवविला जात आहे.

No comments:

Post a Comment