Sunday, 8 September 2019

प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार ■


● बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा प्रतिष्ठित 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार दिला गेला आहे.

● हा पुरस्कार सोहळा 3 सप्टेंबर 2019 रोजी इटलीमधील पापल बॅसिलिका ऑफ असिसी या ऐतिहासिक जागी झाला.

★ शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे.

❇️ 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार :

▪️ लोकांमध्ये शांतता आणि संवाद वाढविण्याकरिता एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.

▪️'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार सर्वप्रथम 1981 साली पोलिश कामगार नेते लेच वालेसा यांना देण्यात आला होता.

▪️दलाई लामा, मिखाईल गोर्बाचेव्ह आणि अँजेला मर्केल हे इतर काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...