Thursday, 12 September 2019

ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बडतर्फ

✍अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांची मंगळवारी सकाळी हकालपट्टी केली.

✍त्यांच्या अनेक कल्पना मला अमान्य असल्याने ही कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

✍नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची निवड पुढील आठवडय़ात जाहीर होईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, मी स्वत: सोमवारी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उद्या पाहू, असे ट्रम्प मला म्हणाले होते. मी वाट पाहून सकाळी त्यांना राजीनामा पाठवला.

✍त्यानंतर त्यांनी माझी बडतर्फी जाहीर केली आहे, असे ट्विट बोल्टन यांनी केले आहे.

✍ट्रम्प यांच्या कारकिर्दीतले बोल्टन हे चौथे आणि सर्वाधिक काळ पदावर राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.पहिले सल्लागार मिशेल फिन फक्त २४ दिवस पदावर होते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...