Tuesday, 3 September 2019

भारतातला सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा आंध्रप्रदेश राज्यात

1 सप्टेंबर 2019 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आंध्रप्रदेश राज्यात देशातल्या सर्वाधिक लांबी असलेल्या विद्युतीकृत रेल बोगद्याचे उद्घाटन केले.

आंध्रप्रदेश राज्याच्या चेरलोपल्ली आणि रापुरू या स्थानकांच्यादरम्यान तयार करण्यात आलेला हा 6.6 किलोमीटर लांबीचा बोगदा ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम रेलमार्गाचा एक भाग आहे. हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरुन 'घोड्याची नाल'च्या आकारात बनविला गेला आहे. बोगद्याची उंची 6.5 मीटर एवढी आहे.

नव्याने बांधण्यात आलेला हा बोगदा कृष्णापट्टनम बंदर आणि दुर्गम भागांच्या दरम्यान मालवाहतूक करण्यासाठी अखंड रेल जोडणी प्रदान करणार आहे.

ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम दरम्यानच्या 112 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकृत रेल्वेमार्गामुळे प्रवासाची वेळ 5 तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या, गाडीला कृष्णापट्टनम बंदर ते ओबुलावरीपल्ली पर्यंत जाण्यासाठी 10 तास लागतात

No comments:

Post a Comment