१९ सप्टेंबर २०१९

राणी रामपालकडे हॉकीचे नेतृत्व

📌स्टार फॉरवर्ड राणी रामपाल हिच्याकडे इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया या दौºयात पाच सामने खेळविले जातील.

📌४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. बचावफळीत दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, निरा खोखर आणि सलिमा टेटे, नमिता टोप्पो, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ यांना स्थान देण्यात आले आहे.

📌मुख्य कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘आम्ही टोकियो आलिम्पिकसाठी पात्रता गाठण्यात महत्त्वाच्या वळणावर आहोत. या दौºयाचा लाभ ओडिशात होणाºया एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध खेळताना निश्चित होणार आहे.’

♦️महिला हॉकी संघ :

✍सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू बचावफळी : दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना

📌खोखर, सलिमा टेटे.मधली फळी : सुशीला चानू पुखराम्बाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल,

📌लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो आक्रमक फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर व शर्मिला देवी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई  महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर  म...