Wednesday, 11 September 2019

पाकच दहशतवादाचा केंद्रबिंदू

✍जीनिव्हा : जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या व्यासपीठावर मांडण्याचा पाकिस्तानने केलेला प्रयत्न मंगळवारी धुडकावून लावताना, ‘‘पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू असून काश्मीरबाबतच्या त्याच्या प्रचारातील खोटेपणाला जग भुललेले नाही,’’ अशी घणाघाती टीका भारताने केली आहे.

✍भारताच्या परराष्ट्र सचिव विजय ठाकूर सिंग यांनी पाकिस्तानने काश्मीरवरून भारताविरोधात केलेल्या आरोपांचा स्पष्ट शब्दांत समाचार घेताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा ठेवायचा की नाही, हा निर्णय घेण्याचा आम्हाला सार्वभौम अधिकार आहे. आमच्या संसदेने तो निर्णय घेतला आहे. त्यात कोणत्याही अन्य देशाला हस्तक्षेप करण्यास वावच नाही.

✍जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक तऱ्हेने सामाजिक आणि आर्थिक विकास घडावा, यासाठी देशाने लोकशाही मार्गाने हा निर्णय घेतला आहे. काश्मिरी जनतेला सर्वाधिक झळ दहशतवादानेच बसली असून पाकिस्तानच्या चिथावणीने हा दहशतवाद फोफावत असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहे. खरे पाहता संपूर्ण जगानेच संघटितपणे दहशतवादाचा कणा मोडण्याची गरज आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न

प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर –: सी. राजगोपालाचारी ...