Thursday, 5 September 2019

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार

👉देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.

👉अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

👉केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्यसाधून देशातील शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018-19’ने गौरविण्यात आले.

👉 रजतपदक, मानपत्र आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

👉केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री- रमेश पोखरीयाल निशंक

No comments:

Post a Comment