Friday, 27 September 2019

ऑस्ट्रेलियात गांजास कायदेशीर मान्यता


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ऑस्ट्रेलियन विधिमंडळांने देशाची राजधानी कॅनबेरा आणि आसपासच्या प्रदेशात वैयक्तिक गांजा वापरास कायदेशीर मान्यता दिली आहे.

त्यामुळे गांजावरील निर्बंध शिथिल करणारे कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियातील पहिलेच शहर ठरले आहे.

ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी (एसीटी) विधानसभेत बुधवारी (ता. २५) राजधानी कॅनबेरा क्षेत्रातील खासदारांकडून याबाबत एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाअंतर्गत ऑस्ट्रेलियातील सहा राज्यांसह, दोन मुख्य प्रातांमध्ये वैयक्तिक गांजा वापरास परवानगी देण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅ ३१ जानेवारी २०२० पासून हा नवीन कायदा अंमलात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मात्र, यासाठी सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रतिव्यक्ती ५० ग्रॅम गांजा बाळगण्यास परवानगी देण्यात आली असून, गांजाचा वापर करणाऱ्याचे वय हे १८ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

याशिवाय प्रति कुटुंब केवळ ४ गांजाच्या रोपांची लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

❇️ संघराज्यीय कायद्यांशी परस्परविरोधी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ऑस्ट्रेलियाच्या संघराज्यीय कायद्यानुसार गांजा हा एक प्रतिबंधित पदार्थ आहे. त्यामुळे नवा कायदा हा ऑस्ट्रेलियातील संसद निर्मित राष्ट्रीय औषध कायद्यांशी परस्परविरोधी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये देखील गांजाच्या वैयक्तिक वापरास कायदेशीर मान्यता देण्याबाबत जनमत चाचणी घेण्यात येणार आहे.
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖➖

No comments:

Post a Comment