✍ मुंबई महानगर क्षेत्रासह अकोला, नाशिक, पुण्यासाठी टाटा पॉवरची योजना
✍ परदेशांत छतावरील सौर ऊर्जानिर्मितीला मोठे महत्त्व देण्यात येत असून मुंबई महानगर प्रदेशात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य असल्याची माहिती टाटा पॉवरच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अध्यक्ष आशीष खन्ना यांनी दिली.
✍ तर मुंबईसह अकोला, नाशिक, पुणे या शहरांत छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या उभारणीसाठी टाटा पॉवर काम करत असल्याची माहिती टाटा पॉवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी दिली.
✍ दिल्लीत छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून २२०० मेगावॉट वीजनिर्मितीची केली जात असून मुंबई-ठाणे, रायगड-पालघर या मुंबई महानगर क्षेत्रात ही क्षमता १४०० मेगावॉट आहे.
✍ मुंबईतील टाटा पॉवर वीज वितरण कंपनीच्या सात लाख ग्राहकांसाठी निम्म्या दरात वातानुकूलन यंत्रणा देण्याबाबतचा उपक्रम व्होल्टासच्या सहाय्याने मंगळवारी सुरू करण्यात आला...
No comments:
Post a Comment