✍भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या ऐतिहासिक घटनेच्या सर्व घडामोडींसंदर्भात अपडेट्स देत आहे. असे असतानाच दुसरीकडे इस्त्रो गगनयान या महत्वकांशी मोहिमेच्या तयारीला लागले आहेत. गगनयान मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदा स्वबळावर आपला अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे.
✍२०२२ पर्यंत किंवा त्याआधी ही मोहिम यशस्वी करण्याचे लक्ष्य इस्त्रोने समोर ठेवले आहे. यासाठी वैमानिकांना प्रशिक्षण देणारे ‘ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर’ही बंगळुरुमध्ये सुरु करणार आहे. या मोहिमेमध्ये अंतराळात जाण्यासाठी अंतराळवीर निवडण्याची जबाबदारी भारतीय वायू सेनेकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे इस्त्रो “चांद्रयान-२” चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणार असतानाच वायू सेनेनेही गगनयान मोहिमेसाठी काही वैमानिकांची अंतराळात जाण्यासाठी निवड करत या मोहिमेच्या प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा केला आहे.
✍डिसेंबर २०२० मध्ये मानविरहीत यान अवकाशात पाठवल्यानंतर जुलै २०२१ च्या आसपास मानवरहित यान गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळात पाठवण्यात येईल. या मोहिमेमध्ये अंतराळात पाठवण्यासाठी वायू सेनेने वैमानिकांच्या निवडीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळात जाणासाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या तुकडीतील वैमानिकांच्या निवडीसंदर्भातील माहिती वायू सेनेने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन दिली आहे.
✍‘भारतीय वायू सेनेने इन्सटीट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसीनमध्ये भारतीय अंतराळवीरांची निवड करण्याचा पहिला टप्पा पार पाडला आहे. निवड करण्यात आलेल्या वैमानिकांना कठोर अशा शारीरिक व्यायाम चाचण्या, प्रयोगशाळेतील चाचण्या, त्यांच्या हृदयाची तपासणी, वैद्यकीय तपासणी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील मानसिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत,’ असे वायू सेनेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
No comments:
Post a Comment