Sunday, 22 September 2019

९३ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो


🅱उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.

🅱 निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही.

🅱साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत अखिल उस्मानाबाद येथे रविवारी पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

🅱महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

🅱घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. 

🅱साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असल्यामुळे ‘मसाप’ने नाव सूचवण्यात आले नाही.

🅱📚दिब्रिटो यांची कारकिर्द 📚🅱

🅱फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

🅱 ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे.

🅱 ‘सुबोध बायबल – नवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.

🅱१५ व्या मराठी ख्रिती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

🅱‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओअॅसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.

🅱वसई येथे वास्तव्य असलेले फादर दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात धर्म आणि वैचारिक लेखनाद्वारे मौलिक भर घातली आहे. 

No comments:

Post a Comment