Wednesday, 11 September 2019

गोव्याच्या प्रियव्रत पाटीलने रचला इतिहास; सोळाव्या वर्षी 'महापरीक्षा' उत्तीर्ण


🅾पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.

🅾तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण असते. "प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

🅾"काल श्रीमती अपर्णा आणि श्री देवदत्ता पाटील यांच्या 16 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचं श्री मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतलं. यासोबतच तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळवला", असं ट्वीट चामू कृष्णाशास्त्री यांनी करुन पंतप्रधान मोदींना त्यात टॅग केल होतं. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचं अभिनंदन केलं.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...