Thursday, 12 September 2019

ईशान्येकडील राज्यांचा विशेष दर्जा हटवण्याचा कोणताही विचार नाही : अमित शाह

🔰आसाममध्ये नुकतीच एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आसामचा दौरा केला. नॉर्थ ईस्ट काऊन्सिलच्या बैठकीसाठी शाह उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या ३७१ व्या कलमाला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सराकर त्याचा सन्मान करते, असे शाह यावेळी म्हणाले.

🔰भारतीय संविधानात ईशान्येकडील राज्यांना देण्यात आलेल्या विशेषाधिकाऱ्यांच्या ३७१ व्या कलमाला विशेष स्थान देण्यात आले असून भाजपा त्याचा आदर करते. भाजपा सरकार यामध्ये कोणताही बदल करणार नाही. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. कलम ३७० आणि कलम ३७१ या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचे शाह यांनी नमूद केले. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर कलम ३७१ बाबतही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. या कलमांतर्गत भारतीयांना त्या ठिकाणी संपत्ती खरेदी करता येत नाही, असंही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment