Thursday, 5 September 2019

कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

👉कादंबरीकार किरण नगरकर यांचे काल  5 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले.

👉ते 67 वर्षाचे होते.

👉किरण नगरकर हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक होते.

👉किरण नगरकरांची पहिली कादंबरी 'अभिरुची' नावाने १९६७-६८च्या सुमारास प्रसिद्ध झाली होती. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस ' या नावाने मौज प्रकाशनाने १९७४ला प्रकाशित केली. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते. 

👉मोजक्याच कादंबर्‍या लिहून नगरकर अत्यंत लोकप्रिय असे कांदबरीकार म्हणून ओळखले जायचे.

👉 'रावण आणि एडी ही त्यांची कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली.  

👉नगरकरांच्या 'गॉड्स लिटल सोल्जर, ककल्ड या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले.

👉2001ला 'ककल्ड' या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 

👉'कबीराचे काय करायचे?' आणि 'बेडटाईम स्टोरी अशी आणखी काही त्यांची पुस्तके चांगलीच गाजली.

👉स्प्लिट वाईड ओपन' ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनयही केला होता.

👉अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...