👉शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्राची घसरण झाली असून, वीस मोठ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तीनवरून सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
👉सन २०१५-१६ हे आधारवर्ष मानून केलेल्या शैक्षणिक गुणवत्ता मापनात
👉केरळचा अव्वल क्रमांक कायम असून,
👉उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे.
👉नीती आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि जागतिक बँक यांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या या अहवालात
👉वीस मोठ्या राज्यांचा एक गट,
👉आठ लहान राज्यांचा दुसरा गट आणि
👉सात केंद्रशासित प्रदेशांचा तिसरा गट अशी वर्गवारी आली आहे.
👉शैक्षणिक गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी दोन श्रेण्या करण्यात आल्या.
👉पहिल्या श्रेणीत शैक्षणिक स्तर, शिक्षणाची संधी, समानता, पायाभूत सोयी-सुविधा यांच्या निष्पत्तीचा आढावा घेण्यात आला, तर
👉दुसऱ्या श्रेणीत या निष्पत्तींना चालना देणाऱ्या प्रशासकीय अंमलबजावणीच्या प्रक्रियांचे निकष निश्चित करण्यात आले. विविध सर्वेक्षणे,राज्यांनी दिलेली माहिती आणि त्रयस्थ पाहणी यांसह ३३ निकषांच्या आधारे राज्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment