संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे.
डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राचे वजन इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाॅंचरद्वारे लाॅंच केले गेले होते. यानंतर त्याने त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेने व आक्रमकतेने भेदले.
या क्षेपणास्राची तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डीआरडोओ’चे अभिनंदन केले आहे. सध्या कलम ३७० हटवण्यात आल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातारण आहे. या पार्श्वभूमीवर ही क्षेपणास्र चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.
यापूर्वी भारतीय सैन्याने राजस्थानमधील पोखरण येथे ‘नाग’ या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्रदेखील डीआरडीओनेच विकसीत केले होते. आता तिसऱ्या पिढीतील रणगाडा भेदी नाग क्षेपणास्राच्या निर्मितीचे कार्य या वर्षाअखेर सुरू होणार आहे.
No comments:
Post a Comment