Wednesday, 11 September 2019

नदालने पाचव्यांदा जिंकल्या वर्षात दोन ग्रँड-स्लॕम स्पर्धा

◾️टेनिसमधील सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने  यूएस ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह त्याने बरेच विक्रम केले पण त्यातील विशेष उल्लेखनीय विक्रम म्हणजे पाचव्यांदा त्याने वर्षात एकापेक्षा अधिक ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकल्या आहेत.

◾️यंदा मे महिन्यात त्याने फ्रेंच ओपनचे 12 व्यांदा अजिंक्यपद पटकावले होते तर आता यूएस ओपनमध्ये तो चौथ्यांदा अजिंक्य ठरला आहे.

✅ नदालने वर्षात एकापेक्षा अधिक ग्रँड-स्लॕम स्पर्धा कधी जिंकल्या ते बघू या…

🔸2019- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔹2017- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔸2013- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔹2010- फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन

🔸2008- फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन

◾️विशेष म्हणजे याआधीच्या चारही वेळा तो त्या- त्या वर्षअखेरीस जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’ होता. आतासुध्दा त्याला ही संधी आहे. तसे झाल्यास तो पाचव्यांदा वर्षअखेर नंबर वन असेल आणि याबाबत फेडरर व जोकोवीचची तो बरोबरी करेल तर पीट सॕम्प्रासच्या सहा वर्षांच्या विक्रमाच्या तो आणखी एक पाऊल जवळ पोहोचेल.

◾️नदालच्या 19 ग्रँड-स्लॕम विजेतेपदांपैकी यूएस ओपनचे हे चौथे अजिंक्यपद (2010, 13, 17 आणि 19) आहे. याशिवाय त्याने फ्रेंच ओपन सर्वाधिक 12 वेळा, विम्बल्डन दोन वेळा तर अॉस्ट्रेलियन ओपन एकदा जिंकली आहे.

◾️आणखी एक विशेष विक्रम म्हणजे 2008 मध्ये 21-22 वर्षांचा असताना नदाल वर्षातील चारही ग्रँड-स्लॕम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत फेरीत पोहोचला होता आणि त्याने किमान दोन विजेतेपद पटकावली होती. त्यानंतर आता 11 वर्षांनी 33 वयात तो पुन्हा एकदा वर्षातील चारही ग्रँड स्लॕम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत पोहचला आणि दोन स्पर्धांत विजेता ठरला.

◾️वाढत्या वयात 11 वर्षानंतरही यशात असे सातत्य राखणारे विरळच, म्हणून नदालचा उल्लेख ‘लंबी रेस का घोडा’ असा केला जातो.

◾️वयाची तिशी ओलांडल्यावर पाच ग्रँड-स्लॕम स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...