Sunday, 1 September 2019

हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत नवव्या स्थानी: इप्सोस सर्वेक्षण


इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालाच्या ठळक बाबी

✔️हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 28 जागतिक बाजारपेठांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे.

✔️यादीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (86%) हे अग्रस्थानी असून जगातले सर्वात आनंदी देश ठरले आहेत.

✔️त्यापाठोपाठ, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त राज्ये अमेरिका, सौदी अरब आणि  जर्मनी या देशांचा क्रम लागतो आहे. नवव्या क्रमांकावर भारत 77 टक्क्यांसह आहे.

✔️अर्जेटिना 34 टक्क्यांसह यादीत शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच 27 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी स्पेन आणि रशिया या देशांची नोंद आहे.

✔️विशेष म्हणजे, 2019 साली आनंदीपणाची पातळी कमी झाली. भारतासाठी या पातळीत सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. सन 2018 मधील 83 टक्क्यांवरून 2019 साली ही पातळी 77 टक्क्यांवर आली आहे.

अहवालानुसार, जेव्हा आनंद हा घटक लक्षात घेतला जातो तेव्हा भारतीय नागरिक चांगली आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक सुदृढता हे दोन घटक आनंद मानण्याचे सर्वात मुख्य कारणे मानतात. तर वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षितता, मित्र आणि जीवनावर नियंत्रण असल्याची भावना ही भारतीयांची आनंदी राहण्याविषयीचे इतर प्रमुख कारक आहेत, असे नव्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...