Sunday, 1 September 2019

‘फिट इंडिया’


🔰 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ केला.

🔰 मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून या लोकचळवळीचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.

🔰 तंत्रज्ञानामुळे आपली शारीरिक क्षमता घटली आहे आणि आपले आरोग्याचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडून गेले आहेत. आज भारतात जीवनशैलीसंबंधी आजार वाढत आहेत. तरुणांनाही ते जडत आहेत. मधुमेह आणि अतिताण याचे प्रमाण वाढत असून, ते मुलांमध्येही दिसून येत आहे. जीवनशैलीतला थोडासा बदल हे जीवनशैलीचे आजार रोखू शकतो. ‘फिट इंडिया अभियान’ हे जीवनशैलीतले छोटे बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे...!!!

No comments:

Post a Comment