भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायदेशात थांबून भारताच्या गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे प्रयत्न करायला हवेत असा टोला ‘फोर्ब्स’मधून लगावण्यात आला आहे. ‘परदेशातील भारतीयांना देशात सगळं ठिक आहे असं सांगत फिरण्याऐवजी मोदींनी देशात थांबून विविध घटकांमधील लोकांमध्ये वाढणारी दरी कमी करण्यासाठी प्रयत्न कराला हवेत,’ असंही ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अॅट होम’ या लेखात म्हटले आहे.
कोलंबिया विद्यापिठामधील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक असणाऱ्या पॅनोस मॉर्डोकोउटास यांनी ‘फोर्ब्स’च्या वेबसाईटवर मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मोदी सरकारच्या धोरणांचा लेखाजोखा मांडणारा लेख लिहिला आहे.
‘एकीकडे मोदी रशियापासून अमेरिकेपर्यंत जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही वर्षांमध्ये भारताचा जीडीपी ८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत पडला आहे,’ असं या लेखामध्ये पॅनोस यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment