Friday, 6 September 2019

शिक्षकांचा आदर राखण्यात भारत आठव्या स्थानी

🔰शिक्षक म्हटले की समाजातील प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचे स्थान असणारी विशेष व्यक्ती आणि शिक्षकी व्यवसाय म्हणजे सन्मान आणि आदर असलेले क्षेत्र. ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स 2018 च्या अहवालानुसार शिक्षकांना आदर देण्याच्या बाबतीत भारत आठव्या स्थानी आहे.

🔰तर चीन आणि मलेशिया हे देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असून शिक्षकी पेशाला डॉक्टरांच्या व्यवसायाइतकाच मान दिला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच फिनलंड सारख्या देशांत या क्षेत्राला सामाजिक कार्याप्रमाणेच महत्त्व दिले जाते.

🔰 जगातील 35 देशांतील  सामान्य नागरिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावली आणि त्यावर आधारित अहवालांवरून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

🔴समाजातील इतर व्यवसायांशी तुलना करताना शिक्षकी पेशाकडे कसे पहिले जाते ❓❓❓

🔰 या एका निर्देशकांचा वापर या अहवालासाठी करण्यात आला आहे. सोबतच शिक्षकांचा त्या त्या देशांतील पगार, पालक त्यांना या व्यवसायामध्ये
येण्यासाठी किती प्रोत्साहित करता किंवा नाही या निर्देशकांचाही वापर या अहवालाच्या निष्कर्षांसाठी करण्यात आला आहे.

🔰2018 च्या ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स अहवालानुसार  शिक्षकांविषयीचा समाजातील आदर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यांमध्ये सकारात्मक संबंध आहे. चीन आणि मलेशिया या देशांना अनुक्रमे 100 आणि 93 गुण असून हे देश प्रथम आणि द्वितीय स्थानावर आहेत. तायवान रशिया आणि इंडोनेशिया हे देश पहिल्या पाचमध्ये तर अर्जेंटिना, घाना, इटली, इस्त्राईल आणि ब्राझील हे देश शेवटच्या पाच देशांत आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...