● एअर मार्शल आरकेएस भदौरिया भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली.
● सध्या ते एअर फोर्सचे व्हाइस चीफ आहेत.
● त्यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती.
● सध्याचे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत.
● आरकेएस भदौरिया १९८० साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले.
● भदौरिया यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह २६ वेगवेगळया प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे.
No comments:
Post a Comment