Monday, 13 December 2021

योजनेचे नाव :- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना

◆योजनेचा उद्देश◆
१) लिंग निवडीस प्रतिबंध करून बालिकेचा जन्मदर वाढविणे. २) मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे. ३) बालिकेला समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात कायमस्वरूपी सामूहिक चळवळ निर्माण करणे. ४) मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.

◆लाभाचा तपशील◆
१) दिनांक १ ऑगस्ट नंतर जन्माला आलेल्या तुमच्या मुलीच्या नावे रुपये ५० हजार बँकेत मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवण्यात येईल. २) दिनांक १ ऑगस्ट आधी जन्माला आलेली १ मुलगी आणि १ ऑगस्ट नंतर जन्माला आलेली १ मुलगी अशा दोघींच्या नावे प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयांच्या मुदत ठेवीची बँकेत गुंतवणूक केली जाईल. ३) गुंतवलेल्या रकमेवर मिळणारे व्याज मुलीला वयाच्या ६ वर्षी काढता येईल. ह्या मुद्दलाची पुन्हा गुंतवणूक करून पुन्हा ६ वर्षानंतर म्हणजेच मुलीच्या १२ व्या वर्षी पुन्हा व्याज काढता येईल. त्याच वेळी पुन्हा ह्या मुद्दलाची गुंतवणूक केल्यास मुलीच्या १८ व्या वर्षी ६ वर्षात जमा झालेले व्याज + मुद्दलाची गुंतवलेली रक्कम काढता येईल.

◆आवश्यक कागदपत्रे◆

●अधिवास प्रमाणपत्र- आई किंवा वडिलांचे
●आधार कार्ड
●उत्पन्नाचा दाखला
●कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र
●बँक पासबुक
●मुलीचे जन्म प्रमाणपत्र
●शिधापत्रिका
●सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

◆संपर्क◆
१) बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण)२) जवळच्या अंगणवाडी केंद्रातील सेविका

No comments:

Post a Comment