Thursday, 19 September 2019

आजचे प्रश्न

📌___________ पर्यंत स्वच्छ आणि हागणदारी मुक्त (ODF) भारत बनविणे हे स्वच्छ भारत अभियानाचे उद्दीष्ट आहे.

(A) 2021
(B) 2020
(C) 2019✅✅✅
(D) 2025

📌मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स ___ ह्यांचा वार्षिक गोलकीपर ग्लोबल गोल पुरस्कार देऊन गौरव करणार आहेत.

(A) बोरिस जॉनसन
(B) नरेंद्र मोदी✅✅✅
(C) जस्टिन ट्रूडो
(D) स्कॉट मॉरिसन

📌सेंट्रल ईक्विपमेंट आयडेनटिटी रजिस्टर (CEIR) याच्या संबंधित कोणते विधान चुकीचे आहे?

(A) हा केंद्र सरकारचा नवा प्रकल्प आहे, जो मुळात सर्व मोबाइल कंपन्यांकडून मिळणार्‍या IMEI क्रमांकांचा डेटाबेस असणार.

(B) हे व्यासपीठ सर्व दूरसंचार कंपन्यांना निलंबित केलेल्या मोबाइल हँडसेटविषयी माहिती सामायिक करण्यासाठी एक केंद्रीय प्रणाली म्हणून असणार, जेणेकरुन हँडसेटमधले सिमकार्ड बदलल्यानंतरही हँडसेट दुसर्‍या नेटवर्कमध्ये कार्य करणार नाहीत.

(C) हा प्रकल्प सध्या तामिळनाडूमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालविला जात आहे.✅✅✅

(D) जेव्हा वापरकर्ता संपर्क करतो तेव्हा व्यासपीठावरील कॉल रेकॉर्डर संपर्क करणार्‍याचा फोन क्रमांक आणि ज्या हँडसेटमधून आला आहे त्याचा IMEI क्रमांक दर्शवितो.

📌कोणत्या बँकेनी इंडियन बँकेसोबतच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे?

(A) अलाहाबाद बँक✅✅✅
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बँक ऑफ इंडिया
(D) पंजाब नॅशनल बँक

📌BBPS याचे पूर्ण नाव काय आहे?

(A) भारत बिल पेमेंट सिस्टम✅✅✅
(B) भारती भीम पोर्टल सिस्टम
(C) भारत बँक पेमेंट सिस्टम
(D) भीम बिल पेमेंट सिस्टम

📌कोणती व्यक्ती परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून प्रथम महिला अधिकारी आहे?

(A) प्रेरणा पाठक
(B) राधिका शुक्ला
(C) अंजली सिंग✅✅✅
(D) देवंशी श्रीवास्तव

📌LRO याचे पूर्ण नाव काय आहे?

(A) लुनार रिवॉल्विंग ऑर्बिटर
(B) लोकल रिकोनैसेन्स ऑर्बिटर
(C) लेव्हल रिकोनैसेन्स ओझोन
(D) लुनार रिकोनैसेन्स ऑर्बिटर✅✅✅

भारताच्या विक्रम लँडरसोबत संपर्क स्थापित करण्याच्या प्रयत्नासाठी नासा(NASA)ची LRO ही चांद्रमोहिम 17 सप्टेंबर 2019 रोजी पाठविण्यात आली..

📌कोणत्या संघटनेनी गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंतीच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या लिखिताचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला?

(A) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)✅✅✅
(B) संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO)
(C) आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)
(D) जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)

📌कोणत्या व्यक्तीची हरियाणाच्या सोनीपत शहरातल्या राय क्रिडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली?

(A) कपिल देव✅✅✅
(B) सुनील गावस्कर
(C) रवी शास्त्री
(D) गौतम गांगुली

No comments:

Post a Comment