संयुक्त राष्ट्रसंघाने ‘इंटरनॅशनल मायग्रेंट स्टॉक 2019’ हे शीर्षक असलेला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या स्थलांतरणाविषयीची माहिती देण्यात आली आहे. आज विविध कारणांमुळे लोक परदेशात वास्तव्य करताना आढळून येते.
अहवालाच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्थलांतरित लोकांमध्ये 2019 साली भारतीय नागरिकांची सर्वाधिक संख्या असून आज 17.5 दशलक्ष भारतीय वंश असलेले नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत आणि या संख्येच्या बाबतीत भारत हा सर्व देशांमध्ये अग्रगण्य देश ठरला आहे.
भारतापाठोपाठ द्वितीय क्रमांकावर मेक्सिको (11.8 दशलक्ष), त्यानंतर चीन (10.7 दशलक्ष), रशिया (10.5 दशलक्ष), सिरिया (8.2 दशलक्ष), बांग्लादेश (7.8 दशलक्ष), पाकिस्तान (6.3 दशलक्ष), युक्रेन (5.9 दशलक्ष), फिलिपिन्स (5.4 दशलक्ष) आणि अफगाणिस्तान (5.1 दशलक्ष) या देशांचा क्रम लागतो आहे. या पहिल्या 10 देशांमधून सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी एक तृतीयांश लोक परदेशात आहेत.
अहवालातल्या ठळक बाबी👇👇
🔸जागतिक पातळीवर स्थलांतरितांची संख्या अंदाजे 272 दशलक्षांवर पोहोचली आहे.
🔸2019 साली भारतात 5.1 दशलक्ष परदेशी लोक आहेत. सन 2010 ते सन 2019 या कालावधीत भारतातल्या एकूण लोकसंख्येचा हिस्सा म्हणून परदेशी स्थलांतरितांचा वाटा 0.4 टक्के एवढा स्थिर आहे. भारतात 2,07,000 निर्वासित आहेत. आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये त्यांचा वाटा चार टक्के आहे.
🔸भारतातल्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांमध्ये 48.8 टक्के महिला आहेत आणि एकूणच परदेशी लोकांचे सरासरी वय 47.1 वर्षे आहे. भारतात बांग्लादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांमधून सर्वाधिक लोक आले आहेत.
🔸प्रादेशिकदृष्ट्या, युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांचे सर्वाधिक प्रमाण आहे, जे की 82 दशलक्ष एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर उत्तर अमेरिका (59 दशलक्ष) आणि उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया (49 दशलक्ष) यांचा क्रम लागतो आहे.
🔸सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी जवळपास 19 टक्के (म्हणजेच 51 दशलक्ष) लोक एकट्या संयुक्त राज्ये अमेरिका या देशात वास्तव्यास आहेत. त्यापाठोपाठ जर्मनी आणि सौदी अरब (प्रत्येकी 13 दशलक्ष) द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर असून त्यामागे रशिया (12 दशलक्ष), ब्रिटन (10 दशलक्ष), संयुक्त अरब अमिरात (9 दशलक्ष), फ्रान्स, कॅनडा व ऑस्ट्रेलिया (प्रत्येकी 8 दशलक्ष) आणि इटली (6 दशलक्ष) या देशांचा क्रम लागतो.
🔸भौगोलिक प्रदेशांनुसार, ओशिनिया (ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह) यामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची लोकसंख्या सर्वाधिक असून त्यानंतर उत्तर अमेरिका (16.0 टक्के), लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (1.8 टक्के), मध्य व दक्षिण आशिया (1.0 टक्का) आणि पूर्व व आग्नेय आशिया (0.8 टक्के) असा क्रम लागतो आहे.
🔸बहुतेक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित उप-सहारा आफ्रिका (89 टक्के), पूर्व व आग्नेय आशिया (83 टक्के), लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (73 टक्के), मध्य व दक्षिण आशिया (63 टक्के) या प्रदेशातून आहेत.
🔸सन 2010 ते सन 2017 या कालावधीत निर्वासित लोक आणि आश्रय शोधणार्या लोकांची जागतिक संख्या सुमारे 13 दशलक्ष इतकी वाढली असून एकूण लोकसंख्येत एक चतुर्थांशने वाढ झाली आहे.
🔸निर्वासित आणि आश्रय शोधणार्या जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 46 टक्के उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये आहेत.
No comments:
Post a Comment