● देशात पहिल्यांदाच ७०० मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत.
● २०३१ पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत जाईल.
● १९६० आणि ७० च्या दशकात डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे निकाल आहेत', असे मत देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी व्यक्त केले.
● 'देशात पहिल्यांदाच ७०० मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत.
● २०३१ पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत जाईल.
● १९६० आणि ७० च्या दशकात डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे निकाल आहेत', असे मत देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी व्यक्त केले.
● डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेहरू विज्ञान केंद्रात सोमवारी 'अंतराळात भारत व अणुऊर्जा' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले.
● अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा क्षेत्रात कार्यरत संशोधकांनी त्यात विचार मांडले. तसेच डॉ. साराभाई यांच्या दूरदृष्टी विचारांवर प्रकाश टाकला.
● डॉ. चिदंरबरम म्हणाले, 'आर्थिक क्षेत्रात देश सध्या विकसनशील असला तरी अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा या क्षेत्रात विकसित देशांच्या यादीत आहोत. याचे श्रेय डॉ. सारभाई व डॉ. भाभा यांनाच जाते. त्यांनी त्यावेळी स्वप्न पाहिले, त्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना त्यावेळी सरकारनेही भरभरून सहकार्य दिले. त्याची रसाळ फळे आपल्यासमोर आहेत.'
● देशाची ऊर्जा मागणी वाढती आहे. अशावेळी औष्णिक निर्मितीतूनच सर्वाधिक वीज मिळत असली तरी त्यातून प्रदूषणही खूप होते. पण आता अणुऊर्जेच्या वापराद्वारे औष्णिक वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषण कमी करता येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
● इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार म्हणाले, 'डॉ. साराभाई यांच्या तेव्हाच्या प्रयत्नामुळेच आज मंगळ, चांद्रयान यासारखे प्रकल्प डोळ्यांसमोर दिसत आहेत.
● भारताने क्रायोजनिक इंजिन देशात तयार केले आहे.
● जीएसएलव्हीच्या तीन यशस्वी मोहिमा केल्या आहेत.
● पुढील काळात लवकरच उपग्रह वाहनाचा पुनर्वापर करण्याबाबतही विचार सुरू आहे.
● भारताने सोडलेला उपग्रह समुद्रात नाविकांना दिशा देत आहे. या यशाचे श्रेय डॉ. साराभाई यांनाच जाते.
No comments:
Post a Comment