🚁 भारतीय हवाई दलाची ताकद आज आणखी वाढली आहे.
🚁अमेरिकन बनावटीची आठ नवी लढाऊ हेलिकॉप्टर्स हवाई दलाच्या सेवेत दाखल झाली आहेत.
🚁 दोन मिसाईल पॉड्ससह ही हेलिकॉप्टर्स शस्त्रूच्या ठिकाणांना बेचिराख करू शकतात.
‼️हवाई दलाकडे येणार २२ हेलिकॉप्टर्स‼️
🚁भारताने २०१५मध्ये अमेरिकेच्या बोइंग कंपनीशी अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा करार केला होता.
🚁या करारामध्ये शत्रूवर आग ओकणाऱ्या अशा २२ हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. ही हेलिकॉप्टर्स सध्याच्या घडीला जगातील सर्वांत अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आहेत.
🚁पहिल्या टप्प्यात आठ हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई दलात दाखल झाली आहेत. करारानुसार २०२०पर्यंत सर्व २२ हेलिकॉप्टर्स भारताच्या हवाई दलात दाखल होणार आहे.
‼️कोणत्या देशांकडे आहे अपाचे हेलिकॉप्टर?‼️
🚁भारती हवाई दलात पहिल्यांदाच अपाचे हे अत्याधुनिक समाविष्ट होत आहे. पण, जगातील अनेक देशांकडे ही हेलिकॉप्टर्स आहेत.
🚁यात अमेरिका, इजिप्त, ग्रीस, इंडोनेशिया, इस्राईल, जपान, कुवैत, नेदरलँड, कतार, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, ब्रिटन, यूएई आणि सिंगापूरसह एकूण १५ देशांकडे अपाची हेलिकॉप्टर आहेत.
‼️कोठे झाला होता वापर?‼️
🚁दहशतवादाविरोधातील सर्वांत मोठी कारवाई अमेरिकेने पाकिस्तानात केली होती.
🚁अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला त्याच्या घरात घुसून ठार करण्यात आले होते. त्या मोहिमेत अमेरिकेने अपाची हेलिकॉप्टरचा वापर केला होता.
‼️काय आहेत अपाचे हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये?‼️
🚁एका वेळी ५०० किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता
🚁साडे तीन तास हवेत राहण्याची हेलिकॉप्टरची इंधन क्षमता
🚁प्रति तास २८९ किलोमीटर वेगाने उड्डाण शक्य
🚁३० एमएम गनमधून एका वेळी १२०० राऊंट फायर करणारी गन
🚁 १९ मिसाईल्स कॅरी करून शकणारी दोन मिसाईल पॉड्स
🚁 लेझर सिस्टम-सेंसर आणि नाईट व्हिजन सिस्टमचा समावेश
🚁 त्यामुळे अंधारातही शत्रूवर हल्ला कररण्याची हेलिकॉप्टरची क्षमता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment