💢 'स्ट्रॉबेरी'चे माहेरघर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शेजारीच नवे महाबळेश्वर निर्माण करण्यात येणार आहे.
💢जागतिक वारसास्थळ म्हणून नावाजलेल्या काससोबत सातारा, पाटण, जावळी या तीन तालुक्यांतील ५२ गावांना या प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे.
💢या प्रकलपाअंतर्गत तीन तालुक्यातील तब्बल ३७ हजार २५८ हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे.
💢या प्रकल्पासाठी येथे नवीन कार्यालय सुरू केले जाणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी सरकारची मालकी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची असणार आहे.
💢 या प्रकल्पात सातारा तालक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५, आणि पाटण तालुक्यातील २९ गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
💢प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्यावर या सर्वच गावांतील पर्यटनाला चालना मिळून या गावात नवीन रोजगरनिर्मिती होणार आहे.
💢 या प्रमुख गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारणीत सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, केलवली, नावली, धावलीसह जावळी तालुक्यातील वेळे, वासोटा, उंबरे वाडी, सावरी, कसबे बामणोली, अंधेरी, कास, म्हावशी, माजरे, शेवांदी, फळणी, देवूर, वाघळी, मुनवले, जांब्रुख. पाटण तालुक्यातील आंबेघर, गढवखोप, नहींबे, देवघर तर्फ हेलवाक, चिरंबे, रासाती, कारवट, दस्तान, वांझोळे, दिवशी खुर्द, काठी, नानेल, घणबी, सावरघर, वाटोळे, गोजेगाव, खिवशी, बाजे, भांबे, घेरादाते गड, केर या ५२ गावांचा समावेश असेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment