Thursday, 3 February 2022

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग

1) नाव मिळवणे. 
अर्थ :- कीर्ती मिळविणे. 
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम 
            येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 

2) रक्ताचे पाणी करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी 
     केले आणि स्वराज्याची स्थापना केली. 

3) सोंग काढणे. 
अर्थ :- नक्कल करणे. 
वाक्य :-  सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब 
            सोंग काढतो. 

4) रात्रीचा दिवस करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले. 

5)भांबावून जाणे. 
अर्थ :- गोंधळून जाणे. 
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात 
           आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो  भांबावून गेला.

6)डोक्यावर घेणे. 
अर्थ :- अतिलाड करणे. 
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला 
    आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर 
    घेतले. 

7) आळा घालणे. 
अर्थ :- बंदी आणणे. 
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा 
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला. 

8) तीरासारखे धावणे. 
अर्थ:- खूप वेगाने धावणे. 
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश 
       स्पर्धेत तीरासारखा धावतो. 

9) मर्जी राखणे. 
अर्थ :- खूश ठेवणे. 
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी 
      जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली. 

10) संगोपन करणे. 
अर्थ :- पालनपोषण करणे. 
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने 
          तिचे संगोपन केले.

11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

No comments:

Post a Comment