Thursday, 21 October 2021

विज्ञान सरावप्रश्न

१) विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे.

   A. ३०००Å ते ७०००Å
   B. २०००Å ते ६०००Å
   C.४०००Å ते ८०००Å
   D. ३५००Å ते ७५००Å

A. ३०००Å ते ७०००Å
----------------------------------------
२) इन्फ्रा-रेड किरणांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो?

अ) रंग सुकवण्याच्या कामात.
ब) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीसाठी.
क) स्नायू दुखी आणि सांधे दुखीवर उपाय म्हणून.
ड) टेलेव्हिजन, स्टिरीओ यांसारख्य साधनांसाठी वापरले जाणारे रिमोट कंट्रोल मध्ये.

   A. अ आणि ब
   B. केवळ ब
   C. अ, ब आणि क
   D. वरील सर्व

D. वरील सर्व
------------------------------------
३) फ्लुरोसंट लॅम्प मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर 'फ्लोरोसन्स' ही प्रक्रिया घडवण्यासाठी होतो?

   A. इन्फ्रा-रेड किरणे
   B. अति-नील किरणे
   C. रेडीओ लहरी
   D. क्ष-किरणे

B. अति-नील किरणे
---------------------------------------
४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) विद्युत क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे क्ष-किरणांचे विचलन होते.
ब) एखाद्या वायुतून जात असताना क्ष-किरण त्या वायूचे आयनन करतात.

   A. केवळ अ
   B. केवळ ब
   C. अ आणि ब दोन्ही
   D. अ आणि ब दोन्ही नाही

B. केवळ ब
-------------------------------------
५) अपवर्तनाच्या क्रियेतून पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते?

अ) प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा.
ब) आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा.

   A. केवळ अ
   B. केवळ ब
   C. अ आणि ब दोन्ही
   D. अ आणि ब दोन्ही नाही

C. अ आणि ब दोन्ही
------------------------------------
६) पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ....... म्हणतात.

   A. प्रकाशाचे अपस्करण
   B. प्रकाशाचे विकिरण
   C. प्रकाशाचे अपवर्तन
   D. पूर्ण अंतर्गत परावर्तन

A. प्रकाशाचे अपस्करण
----------------------------------------
७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.
ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते.

   A. केवळ अ
   B. केवळ ब
   C. अ आणि ब दोन्ही
   D. अ आणि ब दोन्ही नाही

B. केवळ ब
-------------------------------------
८) खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात?

अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो.
ब) आकाश निळे दिसते.
क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.
ड) वाळवंटातील मृगजळ

   A. अ आणि ब
   B. फक्त ड
   C. अ,ब आणि क
   D. वरील सर्व

C. अ,ब आणि क
--------------------------------
९) चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय?

   A. दृष्टिभ्रम
   B. प्रकाशाचे विकिरण
   C. प्रकाशाचे अपस्करण
   D. प्रकाशाचे अपवर्तन

A. दृष्टिभ्रम
------------------------------------
१०) जोड्या जुळवा.

    कॅमेऱ्याचे भाग       डोळ्याचे भाग
अ) शटर                 १) पापणी(eye-Lid)
ब) डायफ्रॅम             २) परीतारिका(Iris)
क) अॅपेरचर            ३) बाहुली(Pupil)
ड) फिल्म               ४) दृष्टीपटल(retina)

             अ   ब   क   ड
   A. १    २    ३    ४
   B. २    ३    ४    १
   C. १    २    ४    ३
   D. २    १    ३   ४

A. १ २ ३ ४

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...