Thursday, 5 September 2019

चर्चित शहर/ राज्य/देश/स्थळ:-(जाने. २०१९ ते जुलै २०१९)

● आसाम:-
आसाम राज्य सरकाने दारंग जिल्ह्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ असणार आहे.

● एव्हरेस्ट :-
एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्य शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. नॅशनल जीयोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्राची स्थापना केली आहे. एक केंद्र ८४३० मीटर आणि दुसरे ७९४५ मीटर उंचीवर उभारण्यात आले आहे

● त्रिपुरा:-
त्रिपुरा राज्य सरकाने सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या स्मरणीय कार्याचे दर्शन घडविण्यासाठी राज्यात एक संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला.

● रशिया:-
५ मे २०१९ रोजी रशियाने पहिली आर्कटिक रेल्वे सेवा सुरु केली. ही रेल्वे रशियातील आर्कटिक क्षेत्रातून नार्वे पर्यंत जाणार आहे.

● प्वेर्टो विलियम्स ( चिली) :-
प्वेर्टो विलियम्स आता जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर ठरले आहे. या पूर्वी जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर अर्जेंटिनाचे उशुआया हे होते .

● गुजरात :-
गुजरात मधील महिसागर जिल्हातील बैलानीसोर तालुक्यात रैयोली या गावी देशातील पहिला डायनासोर जीवाश्म पार्क-संग्रहालय सुरु करण्यात आले.

● सुदान:-
सुदान या देशाच्या लष्कराने निर्देशन करणाऱ्या लोकांना ठार मारणार्याच्या क्रूर कारवाईनंतर आफ्रिकी संघाने सुदानचे सदस्यत्व निलंबीत केले. आफ्रिकी संघ हा आफ्रिकी खंडातल्या ५५ देशांचा समावेश असलेला एक संघ आहे.

● ब्यूएनाॅस आयर्स(अर्जेंटिना);-
ब्यूएनाॅस आयर्स येथे दुसरे जागतिक अपंगत्व शिखर सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. २०१८ मध्ये पहिले शिखर समेलन युनायटेड किंग्डम (युके ) येथे आयोजित करण्यात आले होते.

● गुरुग्राम (हरीयाणा)
IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालानुसार जगातल्या प्रदूषित शहरांमध्ये गुरुग्राम (हरयाणा) हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.तर राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) हा जगातील सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरला.
* प्रथम दहा प्रदूषित शहरे - गुरुग्राम (हरयाणा), गाझियाबाद (उत्तरप्रदेश), फैसलाबाद (पाकिस्तान), फरिदाबाद (हरयाणा), भिवाडी (राजस्थान), नोएडा (उत्तरप्रदेश), पटना (बिहार), होतान (चीन), लखनऊ (उत्तरप्रदेश), लाहोर (पाकिस्तान).

● नुरसुल्तान:-
कझाकिस्तानच्या संसदेने २० मार्च २०१९ रोजी राष्ट्रपती राहिलेले नुरसुल्तान नजरबायेब यांच्या सन्मानार्थ राजधानी अस्तानाचे नाव बदलून नुरसुल्तान करण्यात आले.

●गुरूग्राम:-
११ एप्रिल २०१९ रोजी हरियानाचे मुख्य मुख्य निवडणूक आधीकारी राजीव रंजन यांनी भारतातील पहिले मतदाता पार्कचे उद्घाटन केले

● उत्तराखंड:-
उत्तराखंड (झाझरा) येथे देशातील ५ वी सायन्स सिटी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला. या अगोदर प. बंगाल (कोलकाता), आसाम(गुवाहाटी), गुजरात (अहमदाबाद) आणि पंजाब (कपुरथळा) येथे सायन्स सिटीची स्थापना करण्यात आली आहे.

● नाशिक:-
बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन नाशिक शहरामध्ये पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

● नोत्र दाम कॅथेड्रल:-
पॅरिसच्या सर्वात प्राचीन आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग लागून अख्खी इमारत भस्मसात झाल्याची घटना घडली. 850 वर्षे जुनं असलेलं कॅथेड्रल नोत्र दाम फ्रान्सचा ऐतिहासिक वारसा सांगतं. या चर्चनं 80 राजांचा राज्याभिषेक, दोन साम्राज्यांचा विस्तार, फ्रेंच राज्यक्रांती, जागतिक महायुद्धं असं बरंच काही अनुभवलं आणि सोसलं आहे. हे चर्च 13 व्या शतकात बांधण्यात आलं होतं. अवर लेडी ऑफ पॅरिस' या नावानं प्रसिद्ध असलेल्या या चर्चचं बांधकाम 1163 मध्ये सुरू झालं होतं. हे चर्च बांधायला 180 वर्षं लागली.या चर्चच्या साक्षीनंच 1431 मध्ये दहा वर्षांचा आजारी किंग हेन्री सहावा फ्रान्सच्या गादीवर बसला. जगाला समता, बंधुता, एकता ही मूल्यं देणारी 1789 ची फ्रेंच राज्यक्रांतीही नोत्र-दामनं अनुभवली
नोत्र दामची वैशिष्ट्यं:-
* या चर्चचं बांधकाम गॉथिक शैलीतलं आहे.
* चर्चच्या तीन 'रोझ विंडोज' या तेराव्या शतकात बांधलेल्या आहेत.
* संगीत हे या चर्चचा अविभाज्य भाग आहे.
*या चर्चमध्ये एकूण दहा घंटा आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक घंटेला एका संताचं नाव देण्यात आलं आहे.

● रियो डी जनेरो:-
युनेस्कोने २०२० या वर्षासाठी आपली 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' (World Capital of Architecture) म्हणून ब्राझील देशाच्या ‘रियो डी जनेरो’ या शहराची निवड केली. UNESCO आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना (UIA) या संघटनांनी नोव्हेंबर 2018 मध्ये 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' या शीर्

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...