✍चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत.
✍लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या 2.1 कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला.
✍तर एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील 14 दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
✍इस्त्रोचे ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-2 मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमून गोळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जपान आणि भारताची अवकाश संशोधन संस्था संयुक्तरित्या ही मोहिम राबवणार आहे.
✍भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए) एकत्रपणे या मोहिमेत काम करणार आहेत.
✍2024 मध्ये इस्त्रो आणि जाक्सा या मोहिमेवर काम सुरु करणार आहे. याआधी भारत 2022 ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची चर्चा पहिल्यांदा 2017 साली झाली होती.
No comments:
Post a Comment