Wednesday, 18 September 2019

पुरंदर विमानतळाचे ‘टेकऑफ’

◾️ पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चे (एसपीव्हीए) रूपांतर कंपनीत करण्यास नुकतीच कायद्यानुसार मान्यता मिळाली आहे.

◾️त्यामुळे यापुढे विमानतळासाठी भूसंपादन, निधीसह विविध कामे ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’च्या माध्यमातून होणार आहेत.

◾️पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

◾️ त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

◾️प्राधिकरणाचे विस्तारीकरण करून त्यामध्ये सिडको, पीएमआरडीए आणि एमआयडीचा समावेश करण्यात आला या संस्थांचा हिस्सादेखील राज्य सरकारकडून निश्‍चित कण्यात आला होता.

◾️त्यानुसार एसपीव्हीमध्ये सर्वाधिक ५१ टक्के वाटा हा सिडकोचा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा १९ टक्के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी १५ टक्के हिस्सा असणार आहे.

◾️पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित करण्यासाठी ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट’ या नावाने कंपनीची नोंदणी करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...