Thursday, 5 September 2019

समुद्रयान’ प्रकल्पातून भारत खोल महासागरात खनिजांचा शोध घेणार

👉सन 2021-22 मध्ये पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा असून त्यासंदर्भात ‘समुद्रयान’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

👉चेन्नईची राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) 'समुद्रयान' प्रकल्प राबववित आहे.

👉सुमारे 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामधून तीन व्यक्तींसह सुमारे 6000 मीटर खोलीपर्यंत पाण्याखाली जाण्यास सक्षम असलेले जलयान तयार केले जात आहे.

👉 देशातच विकसित केल्या जात असलेल्या प्रस्तावानुसार समुद्राच्या तळाशी सहा किलोमीटरच्या खोलीवर 72 तास कार्य करू शकणारे जलयान तयार केले जात आहे.

👉सध्या पाणबुडी केवळ 200 मीटरच्या खोलीपर्यंतच समुद्राखाली जाऊ शकते.

👉‘समुद्रयान’ प्रकल्प हा खोल समुद्रात खनिजांचा शोध घेण्यासाठी भु-शास्त्र मंत्रालयाच्या पथदर्शी प्रकल्पाचा एक भाग आहे.

👉या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रतळाशी असलेल्या दुर्मिळ खनिजांचा शोध घेतला जाणार आहे आणि असा शोध घेणार्‍या विकसित देशांच्या पंक्तीत भारताला ठेवणार आहे.   

✅पार्श्वभूमी

👉केंद्रीय हिंद महासागर खोरे (Central Indian Ocean Basin -CIOB) या प्रदेशामध्ये समुद्राच्या तळाशी पॉलीमेटॅलिक नोडूलचा शोध घेण्यासंबंधी भारताला काही विशेषाधिकार दिले गेले आहेत. पॉलीमेटॅलिक नोडूल हे समुद्राच्या तळाशी आढळून येतात.

👉इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISA) कडून दिल्या गेलेल्या अधिकारांमधून पॉलीमेटॅलिक नोडूलच्या संदर्भात शोध घेण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात 75000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ दिले गेले आहे.

👉त्या क्षेत्रात अंदाजे 380 दशलक्ष टन इतके पॉलीमेटॅलिक नोडूलचे स्त्रोत आहे, ज्यात 4.7 दशलक्ष टन निकेल, 4.29 दशलक्ष टन तांबा आणि 0.55 दशलक्ष टन कोबाल्ट आणि 92.59 दशलक्ष टन मॅगनीझ असू शकते.

👉1987 साली पॉलीमेटॅलिक नोडूलचा शोध घेणे आणि त्याच्या वापरासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून केंद्रीय हिंद महासागर खोरे (CIOB) यामध्ये एक विशेष क्षेत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे एक अग्रगण्य गुंतवणूकदाराचा दर्जा मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला.

👉भारतासह इतर सात देशांना/कंत्राटदारांनादेखील भु-शास्त्र मंत्रालयाच्या माध्यमातून समुद्राच्या तळाशी शोधकार्य चालविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

👉इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISA) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे, जी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात महासागरांच्या समुद्रातल्या मृत स्त्रोतांचा शोध घेण्यास आणि त्यांचा वापर करण्यावर नियंत्रण ठेवते.

No comments:

Post a Comment