Wednesday, 4 September 2019

पंतप्रधान आजपासून रशिया दौर्‍यावर


◾️ ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम तसेच भारत-रशिया वार्षिक बैठकीत सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, बुधवारपासून रशिया दौर्‍यावर रवाना होत आहेत. भारत-रशिया वार्षिक बैठकीत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन हेही सहभागी होणार असल्याने या बैठकीला महत्व आले आहे. भारत आणि रशिया यांच्यादरम्यानचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी विविध क्षेत्रातील करार केले जाणार आहेत. 

हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहयोगाबाबत होणार्‍या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांतले या क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी होतील. रशियन हायड्रोकार्बन क्षेत्रात आगामी काळात व्यापक प्रमाणावर काम करण्याची भारताची इच्छा आहे. दुसरीकडे रशियाकडून एलएनजी वायू खरेदी करण्याचा सौदा मोदी यांच्या दौर्‍यावेळी केला जाण्याची शक्यता आहे. काही क्षेत्रांमध्ये रशियाला कुशल कामगारांची वाणवा भासत आहे. त्याची पूर्तता करण्यास भारत उत्सूक आहे.

विशेषतः हिरे निर्मिती क्षेत्रात भारत रशियाला मदत करु शकतो. या संदर्भातही मोदी यांच्या दौर्‍यावेळी चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील एकूण परिस्थितीवर मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान चर्चा होणार असल्याचेही समजते.

No comments:

Post a Comment