Saturday, 28 September 2019

इराक भारताचा मुख्य तेल पुरवठादार देश

भारत सरकारच्या वाणिज्यिक गुप्तचर व सांख्यिकी महासंचालनालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाकडून होणार्‍या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये 72 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या इराक, सौदी अरब, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) हे भारताचे मुख्य कच्चे तेल पुरवठादार देश आहेत. पश्चिम आशियातल्या या पारंपारिक पुरवठादारांच्या पलीकडेही तेलाच्या खरेदीत विविधता आणण्याची योजना भारताने आखलेली असून आता अमेरिकेकडूनही तेलाची आयात केली जात आहे.

अन्य ठळक बाबी

🔸एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका या देशांनी सुमारे 4.5 दशलक्ष टन कच्चे तेलाचा पुरवठा भारताला केला.

🔸इराक हा देशाची कच्च्या तेलाची आवश्यकतेच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग पूर्ण करतो आणि तो देश भारताला तेल पुरवठा करणारा मुख्य देश आहे. इराकने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताला 21.24 दशलक्ष टन वजनी तेलाची विक्री केली.

🔸एप्रिल-ऑगस्ट 2019 या कालावधीत भारताने 91.24 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली, जेव्हा की गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण 93.91 दशलक्ष टन एवढे होते.

🔸सौदी अरब हा देश पारंपारिकपणे भारताचा तेलासाठीचा सर्वोच्च स्रोत राहिला आहे, परंतु 2017-18 मध्ये त्याची जागा प्रथमच इराकने घेतली. सौदी अरब कडून भारताला 17.74 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा झाला.

🔸अमेरिकेने मे महिन्यात आर्थिक निर्बंध घातल्यामुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणे थांबविलेले असून तेथून केवळ 2 दशलक्ष टन तेलाचीच आयात केली गेली.

🔸नायजेरियाने इराणची जागा घेत भारताकडे तेल पुरवठा करणार्‍या देशांमध्ये तिसरे स्थान मिळविले. एप्रिल-ऑगस्टमध्ये त्याने 7.17 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला. त्यापाठोपाठ UAE (6.4 दशलक्ष टन) आणि व्हेनेझुएला (6.17 दशलक्ष टन) या देशांचा क्रम लागतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...