Tuesday, 10 September 2019

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना ‘राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार जाहीर

👉ज्येष्ठ समीक्षक व अनुवादक प्रा. चंद्रकांत पाटील यांना यंदाचा ‘राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

👉मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने हिंदी साहित्य समृद्ध करणाऱ्या इतर भाषिक साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो. 

👉सृजनशील लेखन, सक्रियता आणि दोन भाषांना जोडण्याचे योगदान लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

👉चार दशकांपासून पाटील मराठी-हिंदी साहित्याचा दुवा म्हणून महत्त्वाचे काम करीत आहेत.

👉महत्त्वाच्या हिंदी कविता त्यांनी मराठीत अनुवादित केल्या. तसेच मराठी कविताही हिंदीत भाषांतरीत केल्या.

👉पाटील यांची ‘वैसे वे मेरा शत्रू नही’, ‘रसगंधर्व’, ‘तिची स्वप्ने’, ‘पुन्हा एकदा कविता’, ‘चौकटीबाहेरचे चेहरे’ आदी पुस्तके गाजली आहेत.

👉एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१८ या वर्षांसाठी निवड समितीने पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

👉मराठी व हिंदी भाषेत डॉ. पाटील यांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

👉 त्यांना यापूर्वी भीष्म साहनी यांच्या ‘तमस’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.

👉 ‘कवितांतरण’ या त्यांच्या काव्य संपादनासाठी अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.

👉साहित्य अकादमीतर्फे भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून  चीन  व विश्व हिदी संमेलनात दक्षिण आफ्रिका  येथे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत. 2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅन...