Monday, 9 September 2019

इस्रोचं नासाकडून कौतुक भविष्यात सोबत काम करण्याची तयारी.

✍चंद्राच्या जमिनीपासून अवघ्या काही अंतराच्या उंचीवर असताना चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला अन् त्याचसोबत कोट्यवधी भारतीयांच्या काळजाचा ठोकाही चुकला.

✍तसेच संपर्क तुटला असला तरीही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-2 मोहिमेचे आणि शास्त्रज्ञांच्या ध्येयवाद व चिकाटीचे जगभरातील अनेक देशांकडून, नागरिकांकडून कौतुक केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अशातच जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेही इस्रोच्या या दैदिप्यमान कामगिरीची दखल घेतलीये.

✍“चांद्रयान मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे”, अशा शब्दांमध्ये नासाने इस्रोचं आणि भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. याशिवाय भविष्यात अंतरळामध्ये संयुक्तरित्या काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

✍तर दरम्यान, “चांद्रयान-2 मोहिमेची 95 टक्के उद्दिष्ट्ये साध्य झाली आहेत. लँडर चांद्रभूमीवर सुरक्षित उतरू शकले नाही, बाब गौण आहे,” अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी दिली आहे.

✍तर, इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी पुढचे 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...