Wednesday, 25 September 2019

प्रसिद्ध कॉमेडियन वेणू माधव कालवश

◾️प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन झाले.

◾️ सिकंदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ते ग्रस्त होते.

◾️ प्रकृती अधिकच बिघडल्याने २४ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र २४ तासांच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली.

◾️गेल्याच आठवड्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. लवकरात लवकर किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

◾️पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांतच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वेणू माधव यांच्या अकस्मात निधनाने टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

◾️आंध्र प्रदेशमधील नलगोंडा जिल्ह्यातील कोदाद येथे त्यांचा जन्म झाला.

◾️वेणू माधव यांनी मिमिक्री कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर चित्रपटात कॉमेडियन म्हणून पदार्पण केलं.

◾️१९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संप्रदायम’ या तेलुगू चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं.

◾️ वेणू माधव यांनी जवळपास २०० तेलुगू व तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

◾️ गेल्या दोन वर्षांत त्यांनी राजकारणातही सहभाग घेतला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...