११ सप्टेंबर २०१९

कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूची पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर.

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्काआर्थर अ‍ॅश स्टेडियमवर एक तास आणि ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात १९ वर्षीय बियांकाने ३७ वर्षीय आठव्या मानांकित सेरेनाला ६-३, ७-५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.

१५व्या मानांकित बियांकाचे हे कारकीर्दीतील एकूण तिसरे विजेतेपद असून यापूर्वी तिने एंडियन वेल्स आणि टोरंटो टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे.

४ सेरेनाला गेल्या दोन वर्षांत चार विजेतेपदांनी हुलकावणी दिली. २०१८ आणि २०१९ची विम्बल्डन तसेच अमेरिकन या दोन्ही स्पर्धामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२१ एप्रिल २०२५ टॉप चालू घडामोडी

१. 'एमटी न्यू ड्रीम' जहाज कोणत्या देशाच्या ध्वजाखाली चालत होते? अ. भारत ब. पनामा C. लायबेरिया D. माल्टा उत्तर: C. लायबेरिया २. कोणत्...