Thursday, 5 September 2019

दिल्ली, मुंबई राहण्यासाठी अयोग्य

🏢 जागतिक अहवालातील नोंद; गुन्हे व प्रदूषण वाढीचे कारण 🏭

🏠राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे.

🏠 यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती. 

🏠आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट- ईआययू) "जागतिक राहण्यायोग्य सूची-2019' अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला.

🏠त्यात दिल्ली व मुंबई यांच्या श्रेणीत गेल्या वर्षीपेक्षा घसरण झाली आहे. त्यामुळे ही शहरे राहण्यायोग्य नसल्याचे दिसून येते. या सूचीत पाच प्रमुख मुद्यांच्या आधारे शहराची श्रेणी ठरविण्यात आली आहे. यामध्ये स्थिरता आणि संस्कृती आणि पर्यावरण हे दोन मोठे सर्वांत महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत.

🏠 याला प्रत्येकी 25 टक्के गुण देण्यात दिले आहेत.

🏠त्याचबरोबर आरोग्यसेवा आणि पायाभूत सेवा यांना 20 टक्के गुण आहेत.

🏠 शिक्षणाचा मुद्दा यात सर्वांत शेवटचा असून त्यासाठी 10 टक्के गुण आहेत. 

📌नवी दिल्लीचा क्रमांक 112 वरून 118 पर्यंत खाली आहे.
📌मुंबई गेल्या वर्षी 117 व्या स्थानावर होती. यंदा घसरला असून 119 व्या स्थानी

🏠 गेल्या वर्षभरात राजधानीत किरकोळ गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. तसेच जगातील हवेची सर्वांत खराब गुणवत्ता दिल्लीत असल्याचे "ईआययू'च्या अहवालात म्हटले आहे. .

🏠सांस्कृतिक गटात मुंबईचे अवमूल्यन झाले असल्याने ही घसरण दिसली. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. "ग्लोबल ऍम्बियंट एअर क्‍वालिटी डाटाबेस'ने 2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेला (एचडब्ल्यूओ) याबाबत माहिती दिली आहे. 

🏠गेल्या वर्षात आशियातील काही शहरांच्या स्थानांत मोठे बदल झाल्याचे या सूचीत दिसले आहे.

🏠यात कोलंबोचा अपवाद आहे. तेथील चर्चवर बॉंबहल्ला होऊनही कोलंबो एकाच क्रमांकावर स्थिर आहे.

🏠ढाका या आणखी एका आशियाई शहराचा क्रमांक या सूचित खालून तिसरा आहे. ढाकाची कामगिरी ही आशियातील सर्वांत खराब झाली आहे.

🏠पापुआ न्यू गिनियातील पोर्ट मोरेस्बीचा क्रमांक 135 तर कराचीचा क्रमांक 136 वा आहे. सूचीत तळातील दहा शहरांमध्ये या दोन्ही शहरांचा समावेश आहे. 

🏬राहण्यासाठी जगातील सर्वांत उत्कृष्ट शहरे व कंसात संबंधित देश 🏬

🏘व्हिएन्ना (ऑस्ट्रिया),
🏘 मेलबर्न (ऑस्ट्रेलिया),
🏘सिडनी (ऑस्ट्रेलिया),
🏘 ओसाका (जपान),
🏘कॅलगिरी (कॅनडा),
🏘व्हॅन्क्‍युअर (कॅनडा),
🏘 टोकिया (जपान),
🏘 कोपनहेन (डेन्मार्क),
🏘ऍटलेज (ऑस्ट्रेलिया). 

🏢राहण्यासाठी जगातील सर्वांत खराब शहरे व कंसात संबंधित देश 🏢

🏚दमास्कस (सीरिया),
🏚 लागोस (नायजेरिया),
🏚ढाका (बांगलादेश),
🏚 त्रिपोली (लिबिया),
🏚 कराची (पाकिस्तान),
🏚 पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनिया),
🏚हरारे (झिम्बाव्बे),
🏚डौला (कॅमेरून),
🏚अल्जायर्स (अल्जेरिया),
🏚कराकास (व्हेनेझुएला). 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...