Wednesday, 4 September 2019

जम्मू-काश्मिरात पंच, सरपंचांना विमासुरक्षा

💢जम्मू आणि काश्मिरातील गावांचे सरपंच आणि पंच (पंचायतींचे सदस्य) यांना पोलिस संरक्षण दिले जाणार असून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा कवच पुरवले जाणार आहे.

💢केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मिरातील पंच व सरपंचांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी हे आश्वासन दिले.

💢या शिष्टमंडळाने मंगळवारी येथे शहा यांची भेट घेतली.

💢 'आम्हाला सुरक्षा पुरवण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. त्याप्रमाणे प्रशासन सुरक्षा पुरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे,' असे कुपवाडा जिल्ह्यातील सरपंच मिर जुनैद यांनी भेटीनंतर सांगितले.

💢 तर सर्व पंच व सरपंचांना दोन लाखांचे विमा संरक्षण देण्याचे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिल्याचे श्रीनगर जिल्ह्यातील हरवान गावचे सरपंच झुबेर निषाद भट यांनी सांगितले.

💢जम्मू-काश्मिरात येत्या १५ ते २० दिवसांत मोबाइलचे नेटवर्क पुन्हा प्रस्थापित होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचेही भट म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...