Thursday, 26 September 2019

२३ वर्षांच्या मेहनतीनंतर वैज्ञानिकांनी शोधलं ‘लाल भेंडी’चं नवं वाण


👉भारतामधील कृषी संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना एक मोठे यश मिळाले आहे. जवळजवळ २३ वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय वैज्ञानिकांनी भेंडीचा नवा वाण तयार करण्यात यश मिळाले आहे.

👉भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या (आयआयव्हीआर) वैज्ञानिकांना हे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या भेंडीचा रंग लाल आहे. याच लाल रंगामुळे भेंडीचे नाव 'काशी लालिमा' असं ठेवण्यात आलं आहे.

👉उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेला भेंडीचे नवे वाण शोधण्यात आलेले यश हे अनेक अर्थांने महत्वाचे आहे.

👉या नव्या प्रजातीच्या भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट, लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. सामान्य भेंडीपेक्षा या भेंडीची किंमत अधिक असणार आहे. ही भेंडी सुरुवातील सामान्यांना शंभर ते पाचशे रुपये किलो दराने उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

👉भारतामध्ये पारंपारिक हिरव्या भेंडीचे उत्पादन घेतले जाते. लाल रंगाची भेंडी सध्या पश्चिमात्य देशांमध्ये पिकवली जाते.

👉भारतामध्ये काही प्रमाणात या भेंडीची आयात केली जाते. मात्र आता भारतीय वैज्ञानिकांनी या भेंडीचा नवा वाण शोधून काढल्याने आता या भेंडीचे देशातच उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

👉'आयआयव्हीआर'मध्ये १९९५-९६ पासून या भेंडीसंदर्भात संशोधन सुरु होते. मात्र २३ वर्षांनंतर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या भेंडीचे बियाने डिसेंबर महिन्यांपासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...