▪️जागतिक कनिष्ठ विजेत्या हिमा दासने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.‘‘दोहा येथे होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतून हिमाला पाठीच्या दुखापतीमुळे दुर्दैवी माघार घ्यावी लागत आहे,’’ अशी माहिती भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली. २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत हिमाचा ४ बाय ४०० मीटर महिला आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघात समावेश करण्यात आला होता.
▪️जिस्ना मॅथ्यू, एमआर पूवम्मा, रेवती वीरमणी, शुभा व्यंकटेशन, व्ही. के. विस्मया आणि राजराज विथया यांचा महिलांच्या रिले संघात समावेश आहे. याचप्रमाणे मिश्र संघात जिस्ना, पूवम्मा, विस्मया, जेकॉब अमोज, मोहम्मद अनास आणि नोआह तोम निर्मल यांचा समावेश आहे. धावपटू द्युती चंदला १०० मीटर शर्यतीसाठी नंतर भारतीय संघात स्थान देण्यात आले.
दोहा येथे एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीतून हिमाला अर्धवट माघार घ्यावी लागली होती.
Thursday, 19 September 2019
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा : जागतिक स्पर्धेतून हिमा दासची माघार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...
No comments:
Post a Comment