Sunday, 1 September 2019

प्रधानमंत्री पुरस्कार

🔰 नाशिक येथील योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक आणि मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्यूट’ ला योगाच्या प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. विश्वास मंडलिक
         
🔰 हटयोग, उपनिषद आणि भगवतगीतेचा अभ्यास व संशोधन करून योगाचार्य डॉ. विश्वास  मंडलिक हे गेल्या ५५ वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देत आहेत.

🔰 डॉ. मंडलिक यांनी नाशिक येथे १९७८ मध्ये ‘भारतीय योग विद्या धाम ’ संस्थेची स्थापना केली.

🔰 या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गुरुकुल पद्धतीने योगाचा देश-विदेशात प्रचार व प्रसार केला.

🔰 देशभरात या संस्थेचे एकूण १६० केंद्र तर परदेशात १६ केंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ५ लाख लोकांनी योगाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे.

🔰 त्यांनी योगाच्या प्रचार व प्रसारासाठी विविध पुस्तकही लिहिली आहेत.

🔰 योगक्षेत्रातील  उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना गौरविण्यात आले. 

द योग इन्स्टिट्यूट

🔰 मुंबईतील सांताक्रुझ भागात १९१८ मध्ये स्वामी योगेंद्र यांनी ‘द योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली.

🔰 योग प्रचार व प्रसारासाठी कार्यरत या संस्थेने एक कोटी लोकांना योगाभ्यासासाठी प्रेरित केले.

🔰 या संस्थेने देश-विदेशात ५५ हजारांहून अधिक योग शिक्षक घडविले आहेत.

🔰 संस्थेने योगविषयक माहितीची ५० पेक्षा अधिक प्रकाशने प्रकाशित केली आहेत.

🔰 एनसीईआरटीच्या योगविषयक अभ्यासक्रम निर्मितीत संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे.

🔰 योगाच्या प्रचार-प्रसारातील याच कार्याची दखल घेऊन संस्थेला सन्मानित करण्यात आले..!!

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...