Thursday, 12 September 2019

पर्यटकांसाठी कोलंबोत ‘नव्या दुबई’ची उभारणी.

✍ जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.

✍या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.

✍देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे

✍चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे.

✍विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

✍या ठिकाणी देश-विदेशातील कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून त्यांना ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्टय़ाने जमीन दिली जाणार आहे.

✍या प्रकल्पामुळे श्रीलंकेचा भौगोलिक आणि वित्तीय चेहराही बदलणार असून लवकरच जागतिक नकाशावर देशाची नवी ओळख निर्माण होईल, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

✍पुढील २० वर्षांत श्रीलंकेमध्ये कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून

✍दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी विकसित केली जात आहे.

✍ यात जागतिक दर्जाचे व्यापार केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य, शिक्षणसंस्था, मरिना पार्क, पंचतारांकित हॉटेलसह ११० एकरमध्ये पब्लिक पार्क, ३०० एकरमध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि मनोरंजन पार्क, रिसॉर्ट उभारण्यात येणार आहेत.

✍या ठिकाणी जगभरातील किमान ५०० कंपन्या येतील आणि त्यातून देशातील लोकांसाठी ८० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...